चमचमीत भरली वांगी रेसिपी – एक पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद
भरली वांगी ही एक पारंपरिक आणि अतिशय चवदार महाराष्ट्रीयन भाजी आहे. महाराष्ट्राच्या घराघरात बनवली जाणारी ही भाजी खासकरून पोळी, भाकरी, वरण-भातासोबत अप्रतिम लागते. तुम्ही कोल्हापुरी, पुणेरी किंवा नागपुरी असलात तरी प्रत्येक भागात भरली वांगी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज आपण एका क्लासिक पद्धतीने भरली वांगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी महाराष्ट्रीयन जेवणात फारच प्रसिद्ध आहे आणि चवदार देखील आहे. हि रेसिपी तुम्ही जेवणात रोजच्या स्वयंपाकात अगदी सहज करू शकता.
मुख्य साहित्य:-
- ८-१० लहान वांगी (सडसडीत आणि ताजी)
- १ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो
- ३-४ चमचे तेल
- मीठ – चवीनुसार
- थोडं पाणी
भरावटीसाठी:
- १/२ कप सुका खोबरं किस
- १/२ कप भाजलेले शेंगदाणे
- 1चमचा तिखट लाल तिखट
- १ चमचा धनेपूड
- १/२ चमचा जिरेपूड
- १/२ चमचा हळद
- पांढरे तीळ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
🔸 कृती:
१. वांगी तयार करणे:
- वांगी नीट धुवून घ्या.
- प्रत्येक वांग्याला दोन्ही टोकांना चिरा द्या – एक "+" अशी चीर सोडून त्याला फोड होऊ न देणे.
- पाणी आणि थोडंसं मीठ लावून वांगी बाजूला ठेवा.
२. भरावटीची तयारी:-
- सर्वात आधी एक लहान वाटी शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्या मंद अचेवर,शेंगदाणे भाजले की त्यात अर्धी वाटी खोबरे किस आणि पांढरे तीळ हलके गरम करून घ्या.
- नंतर हे थंड झाल्यावर सर्व एका मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या.त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद,दीड चमचा कांदा लसूण मसाला,एक चमचा लाल मिर्ची पावडर,एक चमचा धने,जिरे पूड,आणि चिमूटभर गरम मसाला व मटण मसाला आणि सर्वात शेवटी चविप्रमाणे मीठ घालून हे मिक्सर ला बारीक वाटून घ्या
हे
कोरडे जिन्नस बारीक केल्यानंतर त्यात 5ते 7 लसूण पाकळ्या,1 इंच आले आणि मूठ भर कोथंबीर घालून घ्या.यामध्ये 2ते 3 चमचे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या.
३. वांगी भरून घेणे:
वांग्यांच्या चिरांमध्ये ही तयार भरवण नीट भरून घ्या. भरताना वांगी फाटू नयेत याची काळजी घ्या.
उरलेली भरवण भाजीमध्ये घालण्यासाठी बाजूला ठेवा.
४. भाजी शिजवणे:-
- एका कुकर मध्ये तेल गरम करा.तेल गरम झाल्यानंतर त्यात एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घाला.कांदा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- नंतर त्यात एकदम बारीक चिरून घेतलेला पिकलेला टॉमॅटो घाला व छान परतून घ्या.कांदा,टॉमॅटो परतून घेतल्यानंतर त्यात दोन तीन कढीपत्याची पाने घालून एकदा परतून घ्या.
- व नंतर त्यात भरलेली वांगी हळूच मांडून घ्या.नंतर त्यावर कुकर च झाकण ठेऊन फक्त दोन मिनिट वाफ काढून घ्या.दोन मिनिट वाफ काढून झाल्यावर वांगी हलक्या हाताने एकदा परतून घ्या.
- आता उरलेली भरवणही(तयार वाटण मसाला )त्यावर घाला.थोडंसं पाणी घालून (जेवढी ग्रेव्ही हवी तेवढंच पाणी घाला )व त्यात एकदम बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घाला आणि झाकण ठेवून फुल गॅस वर दोन शिट्ट्या घ्या .
प्रेशर रिलीज झाल्यावर वांगी बगू शकता छान शिजली आहेत.
भाजी झाली, आता सर्व्ह करा 😋
भरली वांगी गरम गरम असतानाच सर्व्ह करणे उत्तम. ही भाजी तुमचं पूर्ण जेवण स्पेशल बनवते.
सर्व्ह करताना खालील पर्याय उत्तम जमतात
- गरम गरम ज्वारी किंवा बाजरीची भाकरी
- वरण-भाताच्या बाजूला
- तूप लावलेली पोळी
- काही ठिकाणी गोड आमटीसहही भरली वांगी वाढली जाते
भरली वांगी साधारणपणे लंच किंवा डिनरला खास पदार्थ म्हणून दिली जाते.
खवय्यांसाठी ही एक स्वादिष्ट मेजवानीच असते!
📌 टीप्स (Tips & Tricks):💡 उपयोगी टिप्स:
1.वांगी फार पातळ न घेता मध्यम आकाराची घ्या.
2.खोबरं, शेंगदाणे यांचे प्रमाण नीट सांभाळा – हे चवीत फरक करतात.5
.ही भाजी पुन्हा गरम केल्यावर चव अजून छान लागते!
तुम्हाला ही भरली वांगी रेसिपी कशी वाटली? कृपया तुमचा अभिप्राय खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा देतात!
अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी आमचा ब्लॉग ‘Sharmila Kitchen Home’ फॉलो करा आणि रोज नवनवीन रेसिपी मिळवा.
🔴 तुम्हाला व्हिडिओ बघून शिकायला आवडतं का?
मग ही रेसिपी मी YouTube वर सविस्तर दाखवली आहे! जरूर बघा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.👇👇
चमचमीत 🍆🍆भरली वांगी | Maharashtrian Stuffed Brinjal Gravy in Marathi
https://youtu.be/Z2sJPQ-NohE?si=47egisZTpaoiuz33
Electric Kettle / इलेक्ट्रिक केतली👇
स्वयंपाकघरात एकच उपकरणात अनेक कामं हवी आहेत का?तर मग 👇👇👇हे बेस्ट आहे एकदा नक्की पहा
Multipurpose Electric Kettle 1.5L(600 watts) | Stainless Steel Water Boiler, Tea Coffee Maker, Egg Boiler, Milk Heater, Maggie & Soup Cooker | Auto Shut-Off, LED Indicator, Silver👇👇
(Amazon affiliate )
Mixer Grinder / मिक्सर ग्राइंडर👇
स्वयंपाकघरासाठी दमदार आणि टिकाऊ मिक्सर शोधताय का?tr 👇👇👇हा सर्वात बेस्ट आहे
Longway Super Dlx 4 Jar 750 Watt Mixer Grinder - Black & Grey | ABS body | Stainless Steel Blade | |1 Years warranty [Buy now on Amazon 👇 Your Affiliate Link]
🍳Nonstick Cookware Sets:👇
स्वयंपाकाच्या नव्या अंदाजासाठी Hawkins चं खास गिफ्ट सेट!👇👇
Hawkins Ceramic Nonstick 3-Piece Kitchen Gift Set - 1.75 L Deep Kadhai, 16 cm Frying Pan and 24 cm Tava, Grey (24ICGP)
(Amazon 👇 Your Affiliate Link]
🧂 Stainless Steel Masala Boxes:👇
स्वयंपाकघरात मसाल्यांची योग्य मांडणी हवी आहे का?
तर घेऊन या ATROCK Masala Dabba – स्टेनलेस स्टील मसाला डब्बा, जो तुमच्या किचनसाठी अगदी परफेक्ट आहे!
(Amazon 👇 Your Affiliate Link]
बेस्ट इलेक्ट्रिक कूकर अॅमेझॉनवर – आजच खरेदी करा! (Best Electric Cooker on Amazon – Buy Now!)
Electric Pressure Cooker, Outer👇👇👇
(Amazon 👇 Your Affiliate Link]
टिकाऊ स्टील प्रेशर कुकर – स्वयंपाकासाठी बेस्ट चॉईस! (Buy Now on Amazon!)
Prestige 3L Svachh Deluxe Alpha stainless steel Pressure Cooker|Outer lid|
(Amazon 👇 Your Affiliate Link]
Samsung 28L, Convection Microwave Oven with Curd Making
"3-in-1☝️☝️☝️ Convection Microwave – केक, पिझ्झा, जेवण गरम करणं एका ओव्हनमध्ये! (Amazon वर Best Deal!")
🥘The Indus Valley Stainless Steel Cookware Set
(Amazon affiliate )👇👇👇👇
The Indus Valley Triply Stainless Steel Handi/Stock Pot/
Amazon affiliate )👇👇👇👇






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा