10 मिनिटांत बनवा क्रीमी चीज कॉर्न – झटपट आणि चविष्ट रेसिपी
मुलांसाठी किंवा संध्याकाळी हलकासा नाश्ता हवा असताना ही क्रीमी चीज कॉर्न डिश एकदम बेस्ट आहे. तर ही "क्रीमी चीज कॉर्न" रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी डिश आहे.....बाहेर मस्त असा पाऊस🌨️🌧️⛈️🌥️आणि समोर हि डिश आह्हह्ह!!!सुटले न तुमच्या पण तोंडाला पाणी
![]() |
| क्रीमी चीज कॉर्न 🌽🌽 |
साहित्य :-🌽🌽
१ कप स्वीट कॉर्न
2 चमचे बटर
१/४ कप मोझरेला चीज
१/२ कप दूध
1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण
चवीनुसार मीठ
चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो (आवडीनुसार)
🍽️ कृती::--🌽🌽
स्टेप ::-1) सर्वात आधी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायच.पाण्याला छान उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ आणि स्वीट कॉर्न म्हणेज (मक्याची कणीस त्याचे दाणे ) त्या उकळत्या पाण्यात टाकून घ्यावे.व 5 ते 7 मिनिट कॉर्न छान उकळून घ्यावे किंवा शिजून घ्यावे...5ते 7 मिनिटांनंतर कॉर्न छान शिजले की ते एका चाळनिवर काढून घ्यावे.
स्टेप ::-2) एका पॅनमध्ये 2 चमचे बटर गरम करायचे,बटर हलके गरम झाले की त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा.लसूण मंद अचेवर छान परतून घ्यायचा.
स्टेप ::-3)लसूण परतून झाला की त्यात लगेंच एक चमचा कॉर्न फ्लॉअर (मक्याचे पीठ ) किंवा मैदा घालून पुन्हा छान परतून घ्यायच एक ते दोन मिनिट फक्त
स्टेप ::-4)लसूण आणि कॉर्न फ्लॉअर छान परतून घेतल्यानंतर त्यात अर्धी वाटी दुध घालून एक उकळी काढून घ्यायची.दुधाला मस्त एक उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा चिली फ्लेक्स,एक चमचा ओरिग्यानो आणि चविप्रमाणे मीठ घालून घ्यायचे.
स्टेप ::-5)हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात बॉईल केलेले स्वीट कॉर्न घालून पाच ते सात मिनिट छान मिक्स करून घ्यायचं.
स्टेप ::-6) त्यानंतर त्यात आवडीप्रमाणे चीज घालून घ्यायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायाचं.चीज मेल्ट झाले की आणि मिश्रण घट्ट आणि क्रीमी झालं की लगेच गॅस बंद करायचा.
स्टेप ::- 7) तयार आहे आपली खास पावसाळा स्पेशल 🌽🌽"क्रीमी चीज कॉर्न" रेसिपी 😋
🍴 सर्व्ह करा 🌽🌽👇
"क्रीमी चीज कॉर्न" रेसिपी गरम गरम सर्व्ह करा. वरून थोडंसं चीज आणि चिली फ्लेक्स टाका आणि मग चहा बरोबर किंवा मुलांना डब्यात द्या. चव इतकी अप्रतिम लागते की सगळे पुन्हा पुन्हा मागतील!
❤️ खास टिप🍽️🍽️🍽️
- तुम्ही यामध्ये थोडासा मॅयोनीज किंवा क्रीम घालून अजून क्रीमी टेक्सचर मिळवू शकता.
- हि रेसिपी तुम्ही ब्रेड किंवा टोस्टवर ठेवून चीज कॉर्न टोस्ट म्हणूनही सर्व्ह करू शकता.
हि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा,आणखी अश्याच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या....
https://sharmilakitchenhome.blogspot.com/
पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे 👇👇👇खाली क्लिक करा🔗
https://www.youtube.com/@Sharmilakitchenhome
🛒 जर तुम्हाला वरील साहित्य खरेदी करायचं असेल तर दिलेले Amazon Affiliate Links वापरा – त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रोडक्ट मिळतील आणि मला थोडं सपोर्ट होईल. धन्यवाद ❤️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा