एकदम मऊसूत कांदे पोहे l Kanda Poha recipe l पारंपरिक मराठी नाश्ता😋
सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट आणि लवकर होणारा नाश्ता म्हणजे प्रत्येक माराठी माणसाच्या आवडीचे "कांदा पोहे "रोज दिले तरी कंटाळा येणार नाही 😊पोहे एकदम सुट सुटीत होण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
चला मग रेसिपि बगूया
▪️ साहित्य::-
1)पोहे – 1 मोठी वाटी (दोन माणसांसाठी )
2)कांदा – १ मध्यम, चिरलेला
3)मिरच्या – २, चिरलेल्या
4)जिरे,मोहरी – ½ चमचा
5)हळद – ¼ चमचा
6)मीठ – चवीनुसार
7)लिंबू रस – १ चमचा
8)कोथिंबीर – सजावटीसाठी
9)कडीपत्ता
10)तेल- 2 पळी
11)शेंगदाणे - 1 मूठ
▪️ कृती::-
1)सर्वात आधी पोहे चाळनिवर स्वच्छ धुऊन गाळून ठेवा.पोहे धुऊवताना एक काळजी घ्याची ती म्हणजे त्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही.पूर्ण पाणी व्यवस्थित गाळून ठेवा.त्यामुळे पोहे छान मोकळे होतात.पोह्याचा लगदा होतं नाही.
2)कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत.शेंगदाणे भाजून झाले कि ते बाजूला काढून घ्यायचे.बारीक गॅस वर शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे छान खरपूस होतात.
3)नंतर त्याच कढईत जिरे अर्धा चमचा,मोहरी अर्धा चमचा घालून घेऊ.जिरे,मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात कडीपत्ता,आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून छान परतून घ्यायचे आहे.कांदा हलका गुलाबी झाला कि त्यात बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ,सर्व जिन्नस छान परतून झाले कि त्यात आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊ.आणि पुन्हा छान परतून घेऊ.
4)त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून छान परतून घेऊ.हळद घातल्यावर जास्त वेळ परतून घायच नाही नाहीतर हळदीला कडवटपणा येतो.
5) हळद घातल्यावर लगेच धुऊन गाळून ठेवलेले पोहे घालून घेऊ.सगळे जिन्नस एकत्र छान परतून घेऊ.
6) छान परतून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून घेऊ.आता आपले स्वादिष्ट असे पोहे तयार आहेत त्यात वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून लिंबू रस टाकून पोहे सर्व्ह करा.
तयार आहेत "कांदा पोहे "


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा