तांदळाची खीर (rice kheer)
आपल्या इथे कोणता सण समारंभ आला कि गोड धोड हे होतच.गोड काही तरी करायचं म्हणलं तर सर्वात आधी येते ती तांदळाची खीर.करायला फार सोपी अगदी झटपट होणारी आणि कितीही खाल्ली तरी ती खातच राहावी अशी हि तांदळाची खीर.आज आपण ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत – अगदी घरच्या घरी, पारंपरिक पद्धतीने.
साहित्य (Ingredients)::-
1) तांदूळ 2,3 चमचे
2)साखर 1/4 कप
3)विलायची- 1
4)तूप- 2 चमचे
5) दुध - 1लिटर
6) काजू पावडर - आवडीप्रमाणे
कृती(Step-by-step preparation):
Step 1::- सर्वात आधी दोन ते तीन चमचे बासमती तुकडा तांदूळ घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यात एक विलायची टाकून दोन-तीन चमचे पाणी टाकून मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊ.
Step 2::- नंतर एका कढईमध्ये उकळून गार केलेलं दूध घेऊ. दुधाला हलकी उकळी आल्यानंतर बारीक करून घेतलेली तांदूळ आणि विलायची पेस्ट टाकून घेऊ.
Step3::-दुधाला सतत हलवत राहायचे आहे. हळूहळू खीर घट्ट व्हायला लागल्यावर ती त्यात साखर टाकून घेऊ. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता.
Step4::-त्यानंतर त्यात तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्या
Step5::- नंतर त्यात साजूक तुपाचे दोन चमचे टाका. शेवटी त्यात काजूची पावडर टाका.
Step6::- आता गॅस बंद करून त्यात चिमूटभर मीठ टाका त्यामुळे गोड पदार्थाला चव छान येते.https://youtu.be/sXCVPuswmJE?si=4F_CCBTzKcrs1PC_
तयार आहे आपली स्वादिष्ट अशी तांदळाची खीर
टिपा (Tips)::-
1) खीर गार झाली कि घट्ट होते त्यामुळे खीर थोडी पातळ असतानाच गॅस बंद करावा.
2) काजू पावडर टाकली कि खीरीला चव भन्नाट येते.
3)तुमच्या आवडीप्रमाणे खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खाल्ली तरी छान लागते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा