इडली ही आपल्या घरांमध्ये आवडीने बनवली जाणारी एक पारंपरिक आणि हलकी डिश आहे. पण अनेक वेळा इडली सॉफ्ट होत नाही, किंवा कधी चिकट, कधी कोरडी होते. अशावेळी काही खास टिप्स फॉलो केल्यास इडली अगदी हॉटेलसारखी नरम आणि फुललेली होते.
या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ४ सोप्या पण प्रभावी इडली सॉफ्ट होण्यासाठीच्या खास ट्रिक्स!
टिप 1: डाळ आणि तांदूळ योग्य प्रमाणात भिजवा
इडलीचं पीठ नरम होण्यासाठी डाळ आणि तांदळाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे.
प्रमाण:
1 वाटी उडीद डाळ
3 वाट्या इडली राईस / पातळ तांदूळ
1 चमचा मेथी दाणे
टीप: डाळ आणि तांदूळ किमान 6 तास भिजवा. वेगवेगळं भिजवणं चांगलं फर्मेंटेशनसाठी उपयोगी पडतं.
टिप 2: पीठ बारीक वाटा – पण जास्त नाही!
उडीद डाळ अगदी फुलवून वाटली पाहिजे – म्हणजे ती हलकी होते.
तांदूळ थोडं भरड वाटावं – म्हणजे इडलीला थोडी झाकळ असते.
टीप: वाटताना थोडं थोडं पाणी वापरा आणि जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. हे पीठ फर्मेंटेशनसाठी महत्वाचं आहे.
टिप 3: योग्य फर्मेंटेशनचा सिक्रेट!
इडलीचं पीठ 8 ते 12 तास गरम ठिकाणी झाकून ठेवा.
टीप: थंड हवामानात पीठ नीट फर्मेंट होत नाही.
👉 शक्य असल्यास झाकणावर चादर झाकून गरम ठेवा
👉 कधी कधी ओव्हनमध्ये (फक्त लाईट चालू ठेवून) ठेवू शकता
फर्मेंट पीठ फुललेलं, फसफसलेलं दिसतं — आणि वासही थोडा आंबटसर असतो.
टिप 4: स्टीम करताना साचा आणि पाणी – दोन्ही योग्य!
इडली साचा आधीच तेल लावून ठेवा
पाणी आधी गरम करूनच इडली साचा ठेवावा
झाकण नीट लागलं पाहिजे, नाहीतर वाफ पळून जाईल
स्टीम वेळ: मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं
टीप: गॅस बंद केल्यावर 2 मिनिटं थांबा आणि मगच झाकण उघडा – इडली तुटत नाही.
(बोनस टीप ):-
इडली सॉफ्ट होण्यासाठी काही वेळा 1 चमचा पोहे पीठात घालणे किंवा 1 चमचा दही वापरणे हीही युक्त्या वापरता येतात.
तुमच्याकडे अशी खास युक्ती आहे का? कमेंटमध्ये शेअर करा!
जास्त टिप्स आणि घरगुती रेसिपीसाठी भेट द्या 👉 Sharmila Kitchen Home
Batter Fermenting Container (झाकण असलेले स्टील डबे)👇👇
Idali maker👇👇

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा